Monday, April 12, 2021

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; सहा भाजपा कार्यकर्ते गंभीर जखमी

काही दिवसांपूर्वीच ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी (West bengal) समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांनी स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावं असून यामध्ये अजून एकाचा समावेश आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | aninews | zeenews | livehindustan

Web Title: Six Bjp Workers Injured In Crude Bomb Attack In Bengal

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी