Monday, January 18, 2021
Home तारक मेहताचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

तारक मेहताचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC Writer) या मालिकेची चर्चा नेहमीच होत असते. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ही मालिका चर्चेत आली आहे. कारण, या मालिकेच्या एका लेखकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. शो मस्ट गो ऑन ही उक्ती लक्षात घेऊन एकाला एक पर्याय असावा म्हणून अनेक लेखक या मालिकेसााठी काम करत असतात. त्यातलेच एक लेखक अभिषेक मकवाना यांनी मुंबईत आपल्या रहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 27नोव्हेंबरला हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी सायबरद्वारे त्यांची आर्थिक फसवणूक झाली होती. त्यानंतर ते सतत तणावात होते. शिवाय त्यांना याबद्दल अनेकदा फोनही येत होते. पण त्याबद्दल त्यांनी कधी थेट वाच्यता केली नव्हती. अभिषेक यांनी अचानक असं पाऊल उचलल्यानंतर मात्र सगळेच धास्तावून गेले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | jagran | thequint

Web Title: ‘Tarak Mehta’ Writer Dies by Suicide; Family Alleges Cyber Fraud

या लेखकाची अन्य पोस्ट