Sunday, March 7, 2021
Home आंतरराष्ट्रीय डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका, आता Snapchat ने कायमस्वरुपी केलं ‘बॅन’

डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका, आता Snapchat ने कायमस्वरुपी केलं ‘बॅन’

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर सोशल मीडिया कंपन्या सतत बंदी घालत आहेत. आता Snapchat नेही डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन करत असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी कंपनीने ट्रम्प यांच्यावर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत. “आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे”, असं स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितलं. “त्यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली”, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | edition.cnn | ndtv

Web Title: After Capitol Hill Violence Snapchat Permanently Bans President Donald Trump From Platform 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी