Monday, January 18, 2021
Home आंतरराष्ट्रीय शी जिनपिंग यांच्यावर करोना परिस्थितीवरुन टीका करणाऱ्या बड्या उद्योजकाला १८ वर्षांचा तुरुंगवास

शी जिनपिंग यांच्यावर करोना परिस्थितीवरुन टीका करणाऱ्या बड्या उद्योजकाला १८ वर्षांचा तुरुंगवास

करोनाविरुद्धच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भातील निर्णयांवरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) (China) यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करणाऱ्या चीनमधील एका बड्या उद्योजकाला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी रियल इस्टेट कंपनीचे माजी अध्यक्ष रेन झिकियांग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत त्यांना १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही कारवाई करण्याआधी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने झिकियांग यांची पक्षामधून हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे करोना परिस्थित संभाळण्यात (Coronavirus) शी जिनपिंग यांना अपयश आल्याची टीका केल्यानंतर झिकियांग हे सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नाहीत आणि आता थेट त्यांना दिलेल्या शिक्षेची बातमी समोर आली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | hindustantimes | economictimes

Web Title : Chinese Tycoon And Xi Critic Jailed For 18 Years For Corruption Charges

या लेखकाची अन्य पोस्ट