Monday, April 12, 2021

कोरोना वायरस : भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry!

देशात गेल्या काही दिवसांपासून अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू (Coronavirus) लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम कठोर करण्यास सांगितले होते. त्यांनंतरही बऱ्याच ठिकाणी माणसं कोरोनाचे नियम पायदळी तुडवतांना दिसत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने (New Zealand) भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | theguardian | financialexpress

Web Title: New Zealand Temporarily Suspending Travel From India Pm Jacinda Ardern

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी