प्रतिनिधी वृंदाने जो बायडेन यांना ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीत विजयी घोषित केले तर आपण व्हाइट हाऊस सोडण्यास तयार आहोत असा नरमाईचा सूर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आळवला आहे पण अजूनही त्यांनी पराभव मान्य केलेला नाही. मतदानात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला असून त्याबाबत पुरावे देण्याचे मात्र टाळले आहे. त्यांनी सांगितले की, प्रतिनिधी वृंदाने बायडेन यांची निवड केली तर ती मोठी चूक असेल. ते मान्य करणे कठीण आहे. प्रतिनिधी वृंदाने बायडेन यांना विजयी घोषित केल्यास काय कराल असे विचारले असता व्हाइट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ते मान्य करणे कठीणच आहे. त्यांनी बायडेन यांना विजयी घोषित केले तर ती मोठी चूक असेल.
सविस्तर माहितीसाठी :- thehindu | timesofindia
Web Title: So Leave The White House Trump