मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) काल १३१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे तिथली कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ८ इतकी झाली आहे. रुग्णवाढीची आतापर्यंत कोल्हापुरातील ही पहिली वेळ आहे. ९७७ रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari
Web Title : 1316 new corona cases in Kolhapur