राज्यतील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर पोहोचली आहे. आज मुंबईत आणखी १० रुग्णासह २४ रुग्ण सापडले. तर सांगली १, पुणे ४, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे १, नागपूर २ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४ मुंबई आणि नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा ५२ वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एका अहवालानुसार राज्यातील कोरोना मृत्युदर ६.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat.news18 | business-standard | firstpost