काल संपूर्ण महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला. औरंगाबाद येथेही भव्य उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मिरवणुकीत मिठाचा खडा पडला. शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून एका तरूणाची औरंगाबादमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. श्रीकांत गोपीचंद शिंदे ( वय २o, रा. गारखेडा) असं त्या तरूणाचं नाव आहे. आरोपींना पकण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi.bhaskar | loksatta | lokmat