सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले (Ranjitsingh Disle) यांनी भारताचा झेंडा जगात फडकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. “युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat
Web Title: Chief Raj Thackeray Congratulates Ranjitsingh Disle Who Won Best Teacher Award With Rs 7 Crore Global