राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे. तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असे ट्वीट मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | marathi.abplive
Web Title: Dhananjay Munde Admitted In Lilavati Hospital