Saturday, January 23, 2021
Home इतर अखेर ठरलं! फायनलच्या प्रॅक्टिकल्स १५ सप्टेंबरपासून, तर लेखी परीक्षा ऑक्टोबरमध्ये

अखेर ठरलं! फायनलच्या प्रॅक्टिकल्स १५ सप्टेंबरपासून, तर लेखी परीक्षा ऑक्टोबरमध्ये

कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा (Final Year Exam) येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. तसेच राज्यातील सर्व सीईटीच्या तारखा दोन दिवसांत ठरवण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले. १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकतात, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येतील. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता यावी यासाठीचे नियोजन करण्यासंदर्भात राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. तसेच परीक्षा सोप्या पद्धतीने होणार आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | pudhari | marathi.abplive

Web Title : Final Practicals From 15th September, Written Examination In October

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी