मुंबईतील अग्निशमन दलाच्या ३० जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलात कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईमध्ये अग्निशमन दलसुद्धा फार महत्वाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, यामध्ये भारत १० व्या स्थानावर आहे.