जिल्ह्यातील खेड तालुक्यात अलसुरे येथील एका करोनाबाधित रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. करोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे. मागील महिन्यात दुबईहून परत आलेल्या या रूग्णाला सोमवारी खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दाखल करतानाच प्रकृती खालावलेली असलेल्या या रूग्णाचा अखेर मृत्यू झाला.