Thursday, May 13, 2021

भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनाने निधन

डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे (Paskal Dhanare) यांचं (वय ४९) आज सकाळी करोनानं निधन झालं. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारांना यश आलं नाही. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | loksatta

Web Title: Former Mla From Dahanu Paskal Dhanare Dies Of Covid 19

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी