Saturday, January 23, 2021
Home इतर अभिजित बिचुकलेंचं नाव मतदार यादीतून गायब!

अभिजित बिचुकलेंचं नाव मतदार यादीतून गायब!

राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. मात्र, बिचुकले यांचं मतदार यादीतून नावच गायब झालं आहे. नाव मतदार यादीतून गायब झाल्यानंतर बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. बिचुकले साताऱ्यातील मतदान केंद्रावर गेले असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. मतदान यादीत पत्नी अलंकृता बिचुकले यांचं नाव होतं मात्र, अभिजीत बिचुकलेंचं नावाच्या जागी नारायण बिचुकले अशा दुसऱ्याच व्यक्तीचं नाव होतं. या सगळ्या प्रकारानंतर अभिजीत बिचुकलेंनी हे सगळं षडयंत्र असल्याचा दावा, केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title: Graduate Constituency Candidate Abhijeet Bichukale Name Disappeared From The Voting List

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी