मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा पोलिस भरती (Maharashtra Police) प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलिस खात्यात 12 हजार 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. या मेगा भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात 5300 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे 12500 जागा भरल्यानंतर गरज पडल्यास आणखी भरती केली जाईल असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat
Web Title: Home Minister Anil Deshmukh Announces Mega Recruitment For 12,500 Posts In Maharashtra Police