राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. अशातच काही खासगी रुग्णालयातून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. हॉस्पिटलच्या बिलाच्या नावाखाली त्यांची लूट होत आहे. ही बाब लक्षात येताच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयातील ८०% खाटा ह्या राज्य सरकारच्या ताब्यात असणार आहेत. त्यामुळे आता खासगी रुग्णालयातही उपचार खर्च मर्यादित होणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | cnbctv18 | ndtv