वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा (MNS) घेत आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे. ‘सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta | lokmat
Web Title: MNS’s ‘Jhatka Morcha’ Across The State Against Rising Electricity Bills