येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाउन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | livemint | moneycontrol | businesstoday