Monday, September 20, 2021

मुंबईतील ताज हॉटेल पुन्हा दहशदवाद्यांच्या निशाण्यावर ?

मुंबईत २६/११ दहशदवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली हात आहे. नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा एक फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होती. ती व्यक्ती म्हणाली की, ‘कराची स्टॉक एक्सेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये २६/११ सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार.’ या फोन नंतर ताज हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title : Mumbais Famous Hotel Taj Has Received A Bomb Threat From Pakistan

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी