राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करणाऱ्या विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावरुन विरोधकांना टोला लगावला असून कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? अशी विचारणा केली आहे. “आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat
Web Title: Ncp Ajit Pawar On Bjp Over Dhananjay Munde Allegations