Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु असतानाच सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय (Supreme Court) देत कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाने तोडग्यासाठी चार सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली आहे. मात्र, समितीशी चर्चा न करण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नव्या कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती देण्याच्या तसंच चार सदस्यांची समिती तयार करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे”.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | pudhari

Web Title: Ncp Sharad Pawar Supreme Court Farm Bills

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी