Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र आघाडी सरकार बैलासारखे, टोचल्याशिवाय पुढेच जात नाही!

आघाडी सरकार बैलासारखे, टोचल्याशिवाय पुढेच जात नाही!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी गडकरी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी एक वर्ष या सरकारला लागले. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात झाले असते. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | lokmat.news18

Web Title: Nitin Gadkari Maharashtra Government

या लेखकाची अन्य पोस्ट