Thursday, May 13, 2021

आता मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी; शरद पवारांकडे भाजप नेत्याची मागणी

महाराष्ट्राच्या इतिहासात कर्तृत्ववान मराठा स्त्रिया बऱ्याच झाल्या, पण राज्याची महिला मुख्यमंत्री झालेली नाही. म्हणून मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत व्यक्त केली आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींचे कान टवकारले गेले. शेलार यांच्या या वक्तव्याचे आता अनेक तर्क काढले जात आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी पत्रकार विजय चोरमारे यांच्या “कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या संपादित पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला आमदार अॅड. आशिष शेलार आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | mbs

Web Title: Now A Maratha Woman Should Be The Chief Minister Of The State; BJP Leader’s Statement In The Presence Of Pawar

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी