सांगली : इस्लामपूर येथे पुन्हा जनता कर्फ्यू!

0
225
जनता कर्फ्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत विशेष वाढ होत आहे. अशातच सध्या संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अनलॉक ४.० (Unlock 4.0) सुरु झाले आहे. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बऱ्याच प्रमाणात लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र या शिथिलतामध्ये कोरोनाबाधितांची अधिक वाढ होतांना दिसत आहे. म्हणूनच खबरदारीचा निर्णय म्हणून सांगली मधील इस्लामपूर (Islampur) येथे आजपासून म्हणजेच २ सप्टेंबर पासून १० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew) लावण्यात आला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनानं दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

Web Title : Sangli: Curfew In Islampur From Today To Stop Coronavirus Infection

Advertisement

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा