Thursday, May 13, 2021

जम्मू काश्मिरात पाकिस्तानचा हल्ला, कोल्हापुरातील आणखी एका सुपुत्राला वीरमरण

जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील (Sangram Patil) यांना शुक्रवारी वीरमरण आले. आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने कोल्हापुरावर शोककळा पसरली आहे.यापूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. दिवाळीच्या दिवशीच त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. शहिद जवान हे संग्राम पाटील हा सैन्यदलातील ’16 मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होते.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | pudhari | lokmat | loksatta

Web Title: sangram Patil From Kolhapur Martyr In Jammu

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी