Thursday, May 13, 2021

कोरोना वायरस: १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!

राज्यात सध्या अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचे नियम कठोर करण्यास सांगितले होते. त्यांनंतरही बऱ्याच ठिकाणी माणसं कोरोनाचे नियम पायदळी तुडवतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा (SSC HSC Exam) ह्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान आता या परीक्षा पुढे किती तारखेला घेण्यात याव्या याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.’

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: SSC HSC Exam 2021 Exams Postponed Amid Corona Pandemic

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी