Sunday, January 17, 2021
Home इतर पुण्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पुण्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पुण्यात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात या तिघांवर उपचार सुरु होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांमधील एका महिलेचं वय ६४ असून दुसऱ्या महिलेचं वय ४८ वर्ष आहे. तर पुरुषाचं वय ३८ वर्ष आहे. तिन्ही रुग्णांना इतर व्याधीचांही त्रास होता. ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू रविवारी रात्री ९.३० वाजता झाला. तर इतर दोघांचा मृत्यू सोमवारी झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. यासोबत पुण्यातील करोनाबाधितांची संख्या १ हजार ३१९ झाली असून मृतांची संख्या ८० झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

या लेखकाची अन्य पोस्ट