चीन मधील वुहान मधून पसरलेल्या कोरोनाने सर्व जगावर आपले वर्चस्व स्थापित केले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईमध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी हे अगदी कुशल योद्धासारखे लढत आहेत. अशातच काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्यात येणार आहे. त्याचसोबत कंत्राटी डॉक्टर्सचे (Contract Doctors) मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला आणि डॉक्टर्सनासुद्धा यामुळे निश्चितपणे बळ आणि प्रोत्साहन मिळेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.latestly | livemint | mumbailive