नवी दिल्ली ( भारत ) : अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असून, 2024 पर्यंत आम्ही 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा मोठा दावा पंतप्रधान मोदी यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जे सुधारणावादी पाऊल उचललं आहे, त्यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं आहे. जगभरातील देश भारताच्या बाजारातील ताकदीवर विश्वास व्यक्त करत आहेत, असं मोदींनी यावेळी सांगितलं.