करळमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एका ६९ वर्षीय रुग्णाचा कोची मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.