आज म्हणजेच गुरुवारी आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथील एका केमिकल कारखान्यातून विषारी वायूच्या गळतीमुळे सर्वत्र हाःहाकार माजला आहे. या दुर्घटनेमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३०० पेक्षा अधिक लोक आजारी झाले आहेत. त्यामुळे आता त्या कारख्यान्यापासून तीन किलोमीटर पर्यंत असलेली ५ गावे रिकामी करण्यात आली आहे. या सर्व प्रकाराबाबत पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रांसोबत चर्चा केली व आम्ही आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासनसुद्धा दिले.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | ndtv | khabar.ndtv