Sunday, January 24, 2021
Home इतर अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा

अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण (India China) निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग (Ninong Ering) यांनी हा दावा केला आहे. त्यांनी आज यासंदर्भातील ट्विट करत माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | abplive | outlookindia

Web Title: Congress MLA claims Chinese army abducted 5 people from Arunachal Pradesh

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी