Monday, September 20, 2021

जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना कोरोनाची लस मिळणार : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा दावा

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी म्हटले आहे की, सरकार प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करून देण्याच्या तयारीला लागले आहे. यासाठी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत २०- २५ कोटी भारतीयांना कोरोनाची लस टोचण्याचे (Corona Vaccine) सरकारचे उद्दिष्ट आहे. साप्ताहिक कार्यक्रम संडे संवादमध्ये हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ४० ते ५० कोटी डोस मिळवून ते लोकांना देण्याची सरकारची योजना आहे. थोडेफार साइडइफेक्टची शक्यता आहे, मात्र त्यामुळे लसीच्या सुरक्षेबाबत धोका नाही. सरकारने रशियाची लस स्पुटनिक-व्ही घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | pudhari

Web Title: Corona Vaccine To 25 Crore People By July 2021 Health Minister Harshvardhan’s Hopeful Claim

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी