Friday, August 6, 2021

कोरोना वायरस : गेल्या २४ तासांत देशात २ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत चक्क २ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाखांहून कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल एका दिवसात ६२ हजार २२४ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ इतकी झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- tv9 | ndtv | new18

Web Title: Coronavirus Update: 62,224 new cases registered in last 24 hours in the country

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी