Saturday, January 23, 2021
Home इतर देश : २४ तासांत ७८ हजार ५२४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देश : २४ तासांत ७८ हजार ५२४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ७८ हजार ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १ लाख ५ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ६८ लाख ३५ हजार ६५६ इतकी झाली आहे. ५८ लाख २७ हजार ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | amarujala | outlookindia

Web Title: Coronavirus Update: 78,524 new cases reported in the country in the last 24 hours

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी