Thursday, May 13, 2021

दिल्ली लॉकडाउन : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी पाच हजारांची मदत

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच  दिल्ली येथे (Delhi Lockdown) १० मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी पाच हजारांची मदत, तर २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | zeenews | indiatvnews

Web Title: Covid 19 Relief Delhi Cm Arvind Kejriwal Big Announcement Rs 5000 Each To Autorickshaw Drivers And Taxi Drivers 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी