Saturday, January 23, 2021
Home इतर देशाच्या अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – रघुराम राजन

देशाच्या अर्थव्यवस्थेची अधोगती चिंताजनक – रघुराम राजन

देशातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली. अशातच आता देशाच्या जीडीपी (India GDP ) म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न खूप खाली आले आहे. जीडीपी मध्ये गेल्या २४ वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण झाली आहे. जीडीपीमध्ये एप्रिल ते जून महिन्यांमध्ये तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. हे सर्व अत्यंत चिंताजनक असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी व्यक्त केले आणि धोरणकर्ते व नोकरशहांनी आत्मसंतुष्ट वृत्तीला झटकून अर्थपूर्ण सक्रियता दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले. सध्याचे संकट पाहता, सर्वंकष विचार आणि सक्रियतेने कामाला लागलेले सरकार असणे अत्यावश्यक आहे. परंतु दुर्दैवाने सुरुवातीला दिसून आलेला कामाचा धडाका थंडावला असून, सध्याचे सरकार कोषात गेलेले दिसते, अशी टिप्पणीही राजन यांनी केली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | thehindubusinessline | livehindustan | ndtv

Web Title : Decline Of The Economy Is Worrisome Raghuram Rajan 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी