उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी केलेला आमदार कुलदीपसिंग सेंगर याला पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कुलदीपसिंग सेंगर आणि त्याचा भाऊ अतुलसिंग सेंगरसह ७ दोषींना कोर्टाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या बरोबरच दोषींना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड देखील भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.