Wednesday, June 16, 2021

देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे : राहुल गांधी

देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. मात्र देशात कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. यावरून सध्या राजकारण तापलेलं आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार; दिल्लीकरांना आता मोफत लस मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रावर टीका केली आहे. “केवळ दिल्लीमध्येच नाही तर संपूर्ण नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोफत लस द्यावी.” तसेच “चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | ndtv | hindustantimes

Web Title: Every Indian Should Get Free Vaccine : Rahul Gandhi

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी