Monday, September 20, 2021

चीनसह इतर देशांतून आलेल्या हलक्या दर्जाच्या अँटीबॉडी टेस्टिंग किट करणार परत

कोरोना संकटात भारताला चीनसह इतर काही देशांनी हलक्या दर्जाच्या आणि खराब रॅपिड टेस्टिंग किट पाठवल्याचा आरोप केला जात होता. सरकारने त्या सर्व किट त्या-त्या देशांना परत करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या किट्सपैकी एकट्या 5 लाख किट चीनकडून मागवण्यात आल्या होत्या. त्या विविध राज्यांना देण्यात आल्या. परंतु, या राज्यांना आपल्याला केंद्राकडून मिळालेल्या किट खराब असल्याची तक्रार केली होती. यानंतर भारत सरकारने त्या परत पाठवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिली. विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | thehansindia

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी