Thursday, May 13, 2021

जम्मू कश्मिर : माजी राज्यपाल यांचं निधन

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल जगमोहन (Former governor Jagmohan) यांचे निधन झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगमोहन हे प्रदीर्घ काळापासून आजारी होते. अखेर काल रात्री म्हणजेच ३ मे सोमवारी उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगमोहन यांच्या निधनाने राष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indianexpress | zeenews

Web Title: Former J&K Governor Jagmohan passes away

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी