Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय नेताजींच्या फोटोवरुन वाद : राष्ट्रपती भवनातील फोटोमधील ‘ती’ व्यक्ती कोण?; केंद्राने दिलं...

नेताजींच्या फोटोवरुन वाद : राष्ट्रपती भवनातील फोटोमधील ‘ती’ व्यक्ती कोण?; केंद्राने दिलं स्पष्टीकरण

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subash Chandra Bose) यांच्या १२५ व्या जयंती निमित्त म्हणजेच शनिवारी २३ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये नेताजींच्या एका चित्राचे अनावरण करण्यात आलं. मात्र राष्ट्रपती भवनामधील या चित्रावरुन एक नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील व्यक्ती ही खरे नेताजी नसून अभिनेता प्रसूनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला. प्रसूनजित यांनी श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित गुमनामी नावाच्या एका बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील प्रसूनजित यांनी साकारलेल्या भूमिकेच्या फोटोमधून हे चित्र रेखाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आता केंद्र सरकारनेच यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “हा सर्व वाद हा खोट्या माहितीच्या आधारे सुरु आहे. तसेच ही माहिती कोणतेही संशोधन न करता पसवण्यात आलीय,” असंही सरकारने म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | republicworld

Web Title: Govt Refutes Tmc Allegation Says Netaji Photo Unveiled By President Original

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी