Wednesday, June 16, 2021

लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका : आरोग्य मंत्रालय

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी राज्यात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये लहान मुलांना (Children Corona) अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाकडून एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार “लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस नाही. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे,” असं सांगण्यात आलं आहे. तसेच यावेळी १२ वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. 

सविस्तर माहितीसाठी :loksatta | ndtv | india

Web Title: Guidelines For Covid 19 Management In Children 6 Minute Walk Test Remdesivir

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी