Sunday, January 17, 2021
Home इतर गुजरातः बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

गुजरातः बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मिळालेल्या माहितीनुसार देशात अजून एक इमारत कोसळून नागरिकांचा जीव गेला आहे. गुजरातमधील बडोदे येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला (Gujarat building collapses) आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. “सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” दरम्यान, सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | india | indiatv | timesnownews

Web Title : Gujarat: 3 die after under-construction building collapses in Vadodara’s Bawamanpura

या लेखकाची अन्य पोस्ट