Monday, September 20, 2021

#डरपोक_योगी टॉप ट्रेण्डमध्ये; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर तासाभरात २२ हजार ट्विट्स

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी काल ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांची गाडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना घेऊन घटनास्थळावरुन रवाना झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंगवरही काँग्रेसच्या समर्थकांनी #डरपोक_योगी (Yogi Adityanath) या हॅशटॅगच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईचा विरोध केला आहे. राहुल यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर अवघ्या तासामध्ये #डरपोक_योगी या हॅशटॅगवर २२ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | marathi.abplive

Web Title : Hathras Case Congress Trends Coward Yogi Darpok Yogi After Up Police Takes Rahul Gandhi And Priyanka Gandhi In Custody

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी