Sunday, January 24, 2021
Home राष्ट्रीय मुंबईत पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

मुंबईत पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (Petrol) सुरूच आहे. पाच दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज(१३ जानेवारी) तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.

सविस्तर माहितीसाठी :- mumbaimirror | business-standard

Web Title: In Mumbai The Price Of Petrol Has Crossed Rs 91 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी