Sunday, January 24, 2021
Home इतर भारत चीन वाद : तब्बल ४५ वर्षांनी भारत-चीन सरहद्दीवर गोळीबार!

भारत चीन वाद : तब्बल ४५ वर्षांनी भारत-चीन सरहद्दीवर गोळीबार!

भारत-चीनमधील तणावाची परिस्थिती (India China) अधिकच चिघळत चालली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गोळीबाराची घटना घडली. हा सर्व प्रकार काल म्हणजेच सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडला. गेल्या तीन महिन्यांपासून या सीमेवर सतत तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतीय लष्कराने पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरील डोंगररांगांतील महत्त्वाची ठिकाणं काबीज केली होती. यामुळे चिनी सैनिकांनी चुशुल भागात घुसखाेरीचा प्रयत्न केला होता. तो भारतीय लष्कराने उधळून लावला होता. दरम्यान, चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दावा केला की, भारतीय सैनिकांनीच घुसखाेरीचा प्रयत्न केला. तसेच गस्त घालणाऱ्या चिनी सैनिकांना हवेत गोळीबार करून इशारा देखील दिला. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pudhari | maharashtratimes | marathi.abplive

Web Title : Indian Army Fired Warning Shots Along Lac Pla Forced To Take Countermeasures China Global Times

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी