Sunday, January 24, 2021
Home राष्ट्रीय ‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे; साहित्य-पोस्टर्स केले जप्त

‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे; साहित्य-पोस्टर्स केले जप्त

अखिल भारतीय हिंदू महासभेने सुरू केलेलं ‘गोडसे ज्ञानशाळा’ (Nathuram Godse Library) नावाचं वाचनालय दोन दिवसांतच बंद करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात अखिल भारतीय हिंदू महासभेने गोडसे ज्ञानशाळा नावाचं वाचनालय सुरू केलं होतं. ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी गोडसे ज्ञानशाळा हे वाचनालय बंद केलं, तसंच वाचनालयातील साहित्यही जप्त करण्यात आलं. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | zeenews | scroll

Web Title: Madhya Pradesh Nathuram Godse Library Shut Two Days After Opening

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी